आज गच्चीत फिरताना जाणवले की निसर्ग किती प्रकारांनी आपल्याला दान देत असतो . आपण मात्र, क्षुद्र भाव भावनांच्या आहारी जाऊन ह्या देण्याकदे वेळोवेळी पाठ फिरवतो . आपल्याला मी, माझे हे, माझे ते, यापलिकडे पोचायला कदाचित कधीच जमणार नाही।
पावसाचे थेम्ब, पक्ष्यांचा आवाज, आकाशाचे रंग, फुलांचे सुवास, याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो न आपण। आणि आपणच ठरवलेल्या मोठेपनाच्या व्याख्येत बसण्यासाठी जीव तोडून मेहनत करतो। आपल्याला जो सहज मिळतो त्या आनंदाची आपल्याला किम्मत नाही।
असो, कदाचित मानव जातीची निर्मिती याच कारणासाठी झाली असेल। सर्व विसरून स्वत: ची प्रगति करून माणूस कदाचित उत्क्रांती च्या प्रक्रियेत मोठाच हातभार लावत असेल।
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment